अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-06 फेब्रुवारी :- डॉक्टर हरिभाऊ आदमने महाविद्यालय सावनेर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना व सावनेर इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आरोग्य तपासणी शिबीर दिनांक 5 फेब्रुवारी 2023 ला ग्राम नांदीखेडा येथे संपन्न झाले.
याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर आशिष चांडक कोशाध्यक्ष डॉक्टर प्रवीण चव्हाण उपस्थित होते. जनरल सर्जरी विभागात वरिष्ठ चिकित्सक डॉ.अशोक घटे व डॉ. चंद्रकांत मानकर सर यांनी कार्य पाहिले. रक्ताचाप व मधुमेह तपासणी करिता डॉ. अमित बाहेती व डॉ. अंकिता बाहेती यांनी सेवा दिली. स्त्री रोग तज्ञ डॉ. रेणुका चांडक व गौरी मानकर यांनी सहभाग घेतला. डोळे तपासणी डॉ. विलास मानकर सृष्टी नेत्रालय सावनेर यांचे तर्फे करण्यात आली. शुगर तपासणी आस्था पॅथॉलॉजी लॅब सावनेर यांच्यातर्फे करण्यात आली. बालरोग तपासणी डॉ. निलेश कुंभारे व डॉ.आशिष चांडक यांनी केली. ग्रामीण रुग्णालय सावनेर येथून डॉ. संदीप गुजर व त्यांची चमू डॉ. जागृती मानकर व डॉ. प्रराज जयस्वाल यांनी सुद्धा सेवा दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी येथिल डॉ. केतन खरवडे यांनी कार्य बघितले. गावकऱ्यांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घेतला व त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले.