रत्नु कांबळे कोकण ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड :- तालुकातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पेण खरोशी गावातील एका शिक्षित तरुणाचा ऑनलाइन रमी ने जीव घेतला त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हात एकच खळबळ माजली आहे. विश्वनाथ गावंड आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
आत्महत्या केलेले विश्वनाथ गावंड हे व्यवसायात इंजिनीअर होते. त्यांचा पगार वर्षाला 47 लाख इतका होता. परंतु ते वेळ घालवण्याकरीता ते रमी खेळायचे या ऑनलाइन रमीनेच त्यांचा घात केला. या ऑनलाईन रमी खेळात मोठ्या प्रमाणात पैसे हरल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना 10 वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नी दोघेही चांगले नोकरीस आहेत. पण त्या खेळामुळे त्याला 4 कोटींचा फटका बसला. त्याचा सोनेरी संसार उद्धवस्त झाला आहे.
ऑनलाईन पैश्याचे गेम खेळणे आता थांबवा.. आज एका शिक्षित तरुणाचा ऑनलाईन रमी मुळे दारुण अंत झाला. त्यामुळे बंधूंनो, हा गेम जीवघेणा ठरून पाहत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंब, गृह आणि मुलांची काळजी घ्या, ते कुठेही असतील. तुम्हाला कंटाळा आला असल्यास, पॉडकास्ट ऐका किंवा व्हिडिओ पहा. मुलांसोबत पत्ते किंवा कॅरम खेळा, जसे आम्ही तरुण होतो. पोहणे किंवा फिरायला जा. जर एखाद्याला चांगले ठिकाण आवडत असेल तर आत्म्याला चांगले स्थान आवडते. जर तुम्ही भयंकर परिस्थितीत अडकले असाल तर तुम्ही वाईट परिस्थितीत अडकता. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.

