गुन्हे शाखा युनिट-३ चे दिपकशिरसगर यांची धडाकेबाज कामगीरी
दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधि
पुणे:- २४ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट ३, पुणे कडील पोलीस शिपाई दिपक क्षीरसागर यांना बातमी मिळाली की. पोलीस अभिलेखावरील व तडीपार असलेला गुनहगार नाम गोरखसिंग गागासिंग टाक वय ३५ वर्षे रा. बिराजदार नगर, गल्ली नंबर ३. हडपसर, पुणे प्रेस्टिल शाळेजवळ, शिवणे, पुणे येथे असलेबाबत बातमी मिळाल्याने त्यास सदर ठिकाणी जावून शोध घेता तो मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केले तपासात त्याने पुणे शहरात घरफोडी चोरी करून मिळालेले सोन्याचे दागिने हे नाशिक येथील सोनार कैलास रामनाथ नागरे ५५ वर्ष रा शिवनेरी अपार्टमेंट इंद्रकुंड, जाधववाडी, पंचवटी, नाशिक वास विक्री केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे नमुद सोनारास नाशीक येथे जावून त्यास अटक करून त्याचेकडून ६० ग्रॅम वजनाचे दागिने कि रु. ३,००,०००/- चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपी गोरखसिंग मागारिंग टाक याने त्याचे दोन साथीदारांसह मिळून घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यांचेकडून उत्तमनर पोलीस ठाणेकडील १ व मानवडी पोलीस ठाण्याकडील २ असे एकुण ३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपी गोरखसिंग गागसिंग टाक वय ३५ वर्षे रा. बिराजदार नगर गल्ली नंबर ३, हडपसर, पुणे वास मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ यांनी दि. ०६/०४/२०२१ रोजी पासून पुणे पोलीस आयुक्तालय, पिपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा परिक्षेत्रातुन ०२ वर्षा करीता तडीपार केले आहे. तसेच कोथरूड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १३८/२०२२ या मोक्काच्या गुन्हयामध्ये एक वर्षांपासून फरार आहे. नमुद आरोपीवर पुणे शहरामध्ये घरफोडी चोरीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. तसेच गोरखसिंग गागसिंग टाक हा तडीपार असताना नाशीक येथे रहाणेस आहे त्याकाळात स्याने नाशीक पोलीस आयुक्तालयामधील: १. पंचवटी पोलीस ठाणे मधील ३ घरफोडी चोरी, ३ २. नाशिक रोड पोलीस ठाणे मधील १ घरफोडी चोरी,
३. आडगाव पोलीस ठाणे मधील २ घरफोडी चोरी असे एकुण ७ गुन्हे केलेले असून सदर गुन्हयांमध्ये तो चॉटेड आहे.
सदरची कामगिरी ही, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १, पुणे शहर श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनिता मोरे, युनिट-३ चे पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार (चालक), संजिव कळंबे, प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, गणेश शिंदे. साईनाथ पाटील, सतिश काळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाणे केली आहे. दाखल गुन्हयाचा पुढिल तपास अजितकुमार पाटील पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३. पुणे शहर हे करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट-३ गुन्हे शाखा पुणे शहर,

