मुंबईत एका महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती हा मनसेचा नेता असल्याची माहिती समोर आली आहे.
रुपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत वादळ उठल आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने दबंगगीरी दाखवत मुंबादेवी परिसरात महिलेला भररस्त्यात मोठ्या प्रमाणात मारहाण केली, त्यामुळे मुंबईत राजकारण तापल आहे. मारहाण करणारा व्यक्ती हा मनसेचा उपविभाग प्रमुख आहे. त्याचे नाव विनोद अरगिले असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव साठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र, याच मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मुंबई येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने बेदम मारहाण केली. मारहाण करणारा व्यक्ती हा मनसेचा पदाधिकारी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ही घटना मुंबईतील मुंबादेवी परिसरात घडली आहे.
मुंबादेवी परिसरात महिलेला मारहाण घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मनसेचा पदाधिकारी हा भररस्त्यात महिलेच्या कानशिलात लगावतो आणि त्यानंतर तिला धक्का देत पाडतो असेही व्हिडिओत दिसत आहे.
या घटनेप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेला मारहाण होत असताना रस्त्यात इतरही नागरिक उपस्थित होते मात्र, या नागरिकांच्या समोरच एका महिलेला भररस्त्यात मारहाण झाली. महिलेला मारहाण करणारा व्यक्ती हा मनसेचा पदाधिकारी आहे त्यामुळे आता मनसेकडून या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यावर कुठली कारवाई करण्यात येते का? हे पहावं लागेल.

