प्रवीण जगताप, MSN न्युज प्रतिनिधी
पुलगाव :- फिर्यादी श्री मोहम्मद मुस्ताक, रा. आठवडी बाजार, पुलगाव हे परिवारासोबत आनंद मेला बघायला गेले तेव्हा त्यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस. क्र. एएच-३२/यु-३४७३ ही एका दुकानासमोर ऊभी ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुलगांव येथे अप.क्र. ८०४/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कळंब येथील शंकर ऊर्फ देडफुट्या कुंभरे व त्याचा साथीदार श्रीकृष्ण सोलंखी यांना नागपुर येथुन ताब्यात घेवून चोरी संबधाने सखोल विचारपुस केली असता त्याने गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपीच्या ताब्यातुन चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली. आरोपीकडून चिंतामणी मंदीर, कळंब येथील चोरी गेलेली मोटर सायकल सुद्धा जप्त करण्यात आली.
आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.