देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- केंद्र सरकारच्या नवीन ट्रक ड्राइव्हर विरोधी कायदा ‘हिट अँड रन’ च्या अनुषंगाने भारतीय न्याय दंड संहिता २०२३ च्या निषेधार्थ एकता मारोती ट्रान्सपोर्ट संघटना, बुटीबोरी यांचेकडून आज दि.१ जानेवारी ला रेल्वे स्टेशन येथील रेल्वे धक्यावर चालक मालक यांनी कामबंद आंदोलन केले.
ट्रक चालक हे जास्तीत जास्त गरीब कुटुंबातील असून आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी जीव मुठीत घेऊन ट्रक चालवीतात. ट्रक चालवीत असतांना जर त्यांचे हाथुन कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास अपघाताच्या बाबतीत लावलेले कायदे हे अत्यंत अमानवीय व कठोर असे असल्याने ट्रक चालक मालक संघटनेने निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र प्रदेश कमेटी महासचिव व एकता मारोती ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष मुजीब पठाण यांच्या नेतृत्वात ट्रक चालकांवर लावलेले अमानवीय कायदे सरकारने परत घ्यावे याकरिता बुटीबोरी चे पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांना निवेदन दिले. या प्रसंगी युसूफ शेख, आरिफ शेख, संजय पोपडी, अन्सारभाई व एकता मारोती ट्रान्सपोर्ट संघटनेचे ड्राइव्हर, क्लीनर उपस्थित होते.

