दिलीप दहागावकर, धाबा-तोहोगाव प्रतिनिधी
मो नं 7498073728
धाबा:- जंगली हिंसक प्राणी गावात शिरून गावकरी आणि प्राळीव प्राण्यावर हल्ला करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावकरी भीतीच्या सावटखाली आहे.
महाराष्ट्र आणी तेलंगणा राज्याची सिमा अगदी टोकावर वसलेल्या आणी जंगल क्षेत्रापासून दूर असलेल्या पोडसा गावात मध्यरात्री बिबट या वन्यजीव प्राण्याने कहरच केला वर्धा नदिकाठी असलेल्या पोडसा गावात मध्यरात्री बिबट आला व थेट गोठ्यातील मेंढ्यावर वरती हल्लाबोल केला मेड्यांचा कल्होळ मालकाच्या लक्षात येताच गोठ्यातील दृश्य बघून मालकाच्या अंगावरील थरकाप उसरला बिबट अक्षरशहा तूटून पडला असतानाचे दृश्य बघून मालकाने आरडाओरडा केला हे ऐकून गावकरी एकत्र आले पण तो पर्यंत बिबट सात मेढ्याला आपला आहार बणवीला होता तर सहा मेढ्या जखमी झालेल्या होत्या घडणेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण गाव जागा झाला लोकांचा जमाव पाहून बिबट पसार झाला या घटणेमूळे गावात दहशत निर्माण झाली आहे या कडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे असे नागरीक म्हणत आहेत

