✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बरोबर बंडखोरी केल्यापासून मागच्या दोन महिन्यात शिंदे गट विरूद्ध शिवसेना यांच्यात मोठा राजकारणी वाद सुरू आहे. अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असून राजकारण तापल आहे.
महाराष्ट्र शिंदे गट आणि शिवसेनेचा वाद आता हातघाईवर जाऊन पोहोचला आहे. गणपती विसर्जनावरून शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक भिडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यामध्ये सरवणकर यांनी गोळीबार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आरोपांचे खंडण केले आहे.
मुंबईत आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनाच्या मिरवणुका निघत आहेत. दरम्यान यावेळी किरकोळ वादावादीचे प्रसंगही घडले परंतु शिंदे गट आणि शिवसेना आमनेसामने आल्याने या वादाचे रुपांतर मोठ्या स्वरुपात होण्याची शक्यता होती. प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता. असे म्हटले आहे.
शनिवारी हा वाद आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यावरून शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

