लेखक: राजकुमार वरघट, नागपूर
Mob. न 9970195325
मराठी लेख:- विविधतेने नटलेला भारत भूतलावरचा एकमात्र देश अनेक धर्म, जाती, बोली, भाषा, पोशाख, प्रथा, परंपरा, सण, उत्सव तरीही अखंड अनेकतेत एकता हीच आपली खरी ओळख जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला संविधानावर चालणार हा देश विविधता हीच आमची श्रीमंती हीच विविधता आमचा अभिशाप बनू पाहत आहे.
धर्म म्हणजे काय? याची व्याख्या सर्वांनी आपल्या सोई नुसार करून ठेवली आहे. त्यामुळे खोलात न जाता आपल्या धर्माचा सर्वांना गर्व असावा यात दुमत नाही. पण गर्व आणि गर्वीष्टता यामध्ये असलेली बारीक रेष आपण पुसायला निघालो आहोत. आपल्या धर्माचा अभिमान असणे हा आपला हक्क आहे. पण दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणे हे आपले कर्तव्य हे विसरता काम नये. धर्म, धार्मिकता, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा ताळमेळ बसविण्यात आपण कमी पडत आहोत.
राजकारणात धर्माचा प्रवेश झाल्या पासून म्हणण्यापेक्षा राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी राजकारणात धर्म घुसविल्यामुळे आपल्या एकतेला सुरुंग लावल्या जात आहे पण तो आपल्याला कळू नये हा निष्काळजीपणा आपले दुर्देव्य ठरू नये म्हणजे पावले हा धोका वेळीच ओळखून देशाचे नागरिक म्हणून आपण जागृत होणे गरजेचे आहे हीच आजच्या काळजी गरज आहे.
राजकारणाची सुरवात मुळात समाजकारणातून व्हायची पण आता समाजकारण सेवा नसून धंधा झाला आहे. काही समाजसेवकाचा अपवाद सोडला तर हेच खरे आहे. राजकारणाचे प्रवेशद्वार असलेले समाजकारण आता पार बदलेले आहे. आता समाजसेवा करतो म्हंटले तर पैसे लागतात म्हणून पैसेवाले समाजसेवेच्या आड राजकारणात आपल्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करतात त्या गैर असं काही नाही पण निस्वार्थपणाच्या भावनेला सुरुंग लावला त्याचे काय? या आडमार्गाने न जाता पैश्याच्या जोरावर योग्यता नसतांना जाणारे सुद्धा आहेतच हेच लोक राजकारण नासवत आहेत. राजकारण हा लोकशाही असलेल्या देशाचा कणा आहे लोकांचे प्रश्न सोडविणे जनतेला न्याय देणे सुखसोई उपलब्ध करून देणे, रोजगार, आरोग्य, शिक्षण देणे हे शक्य होते. मग प्रश्न हा उपस्थित होतो ह्या सोई आपल्याला मिळाल्या काय? किती मिळाल्या? राजकारणात या गोष्टीला प्राधान्य दिलं जात का? तर नाही जेव्हा पासून धर्माचा राजकारणात समावेश केला गेला तेव्हा पासून ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम झाल्या नवल म्हणजे आपणही धर्माला प्राधान्य दिलं मूलभूत गरजा हा आपला अधिकार आहे हे विसरत चाललो आहे. धर्माकरिता रस्त्यावर उतरणारे आम्ही इथे मात्र मृग गिळून चूप बसतो.
लोकशाहीत आपन राजा आहोत हे विसरतो याला काय म्हणावे? धर्माचे राजकारण सर्वच पक्ष करतो ते त्याच्या उद्देशात सफल झाले धर्म हा निवडणूक जिंकण्याचा सत्ता मिळविण्याचा सोपा मार्ग त्यांना गवसला आहे. आपणही धार्मिक कट्टरतेकडे नकळत वळत चाललो आहोत आणि हेच देश्याच्या अखंडतेचे कवच तोडू पाहत आहे. धार्मिक कट्टरता आणि चुकीचे राजकारनाचे फळ आज “श्रीलंका’ भोगत आहे. भारत त्या मार्गाने जात आहे हे मात्र निश्चित. भारताचा श्रीलंका होणार नाही याचा एक भारतीय म्हणून प्रत्येकाला विश्वास आहे. हा विश्वास कायम राहावा म्हणून आपण धर्म धार्मिकतेचा अतिरेक टाळावा, राजकारण्यावर अंकुश लावावा, प्रश्न विचारावे वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरावे हे लोकशाहीतले आपले हक्क आहे. ते आपण विसरत चाललो आहोत उगाच “मतदार राजा” असे आपल्याला संबोधले जात नाही. आपण राजा आहोत आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे सेवक आहेत. देशात मात्र उलटे होतांना दिसते पैदल फिरणारे,सायकल वर सैर करणारे चाळीत राहणारे अल्पावधीत कोटीच्या गाडीत फिरतात बंगल्यात राहतात आणि आपण मात्र जिथल्या तिथे असे का? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा उत्तर मिळेल.
ज्या झपाट्यात त्यांची प्रगती होते तशी प्रगती वॉर्डाची का नाही? शहराची का नाही? राज्याची का नाही? देशाची का नाही? कारण आपण त्याचा जाळ्यात अलगद अडकलो आहोत ते आपल्याला (सर्व पक्ष) धर्माच्या राजकारणात गुंतविण्यात यशस्वी झाले आहेत म्हणून धर्माची चिंता करू नका कुठल्याही धर्माचे स्थान सर्वोच आहे. धर्माने जी उंची गाठली आहे. ती उंची कुणीच कमी करू शकत नाही आणि ती ताकत कुणात नाही. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. धर्माला राजकारणापासून दूर ठेवा कारण कुठल्याही धर्माला देशात धोका नाही तो हजारो वर्षाचा ठेवा आहे. हजारो वर्षांपासून तो अबाधीत आहे. मग आताच धर्म धोक्यात का आला? विचार करा प्रश्न सोपा आहे.
धर्म, राजकारण, समाजकारण हे महत्वाचे आहे पण देश त्याहून महत्वाचा आणि आपली भूमिका, जबाबदारी, आपले कर्तव्य, आपली जागृतता, आपले महत्व त्यापेक्षा महत्वाचे आहे. आपले महत्व ओळखा राजकारण्याच्या हातचे बाहुले बनू नका देशहित, लोकशाहीचा सन्मान संविधानाचा मान ठेवा.


Apan je kahi vichar prgatkele ti vastu stihti aahe jar dhamvede aani adhade zolo tar desh ha punna gulamikade jayala we’d laganar nahi