आशिष गजभिये, सावनेर प्रतिनिधी
सावनेर:- पासून दहा ते पंधरा किलोमीटर असलेल्या केळवद येथील वार्ड क्रमांक चारचा पाणीपुरवठा मागील दोन महिन्यापासून बंद आहे. पाऊस व पुरामुळे जलवाहिनी फुटल्या कारण स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून वारंवार आश्वासन दिले जात आहे. मात्र दोन महिन्यात फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात न आल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ राजकारणात मग्न असल्याचा आरोप बौद्ध पुरा भागात राहणाऱ्या महिला आणि नागरिकांनी केला आहे.
केळवद हे गाव सावनेर तालुक्यातील मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावापैकी एक असून या गावाची लोकसंख्या 12000 च्या वर आहे संपूर्ण गाव सोबत या भागालाही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यापासून या ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. मध्यंतरी कोसळलेल्या पावसामुळे पूर आला आणि वार्ड क्रमांक चार भागाला पाणीपुरवठा करणारी फुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. या दोन महिन्यात फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करून या भागाचा पाणीपुरवठा सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने फारसे प्रभावी प्रयत्न केले नाहीत यामुळे ही समस्या गंभीर रूपाची असून नागरिकांना त्रास दायक ठरत आहे. असा आरोप या वार्डातील भागातील नागरिकांनी केला आहे.
केळवद पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी खोदण्याचे आल्या असून गावात पाण्याचे योग्य वितरण व्हावे म्हणून दोन टाक्या ही बांधण्यात आल्या आहेत. तरीही बुद्ध पुरा भागाला पाणीपुरवठा मिळेनासे झाले आहे. ग्रामपंचायतच्या बँक खातेदारामुळे ही समस्या रखडली असल्याचे जाणकारांनी सांगितले यामुळे ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी सुशील रंगारी, मनोज पाटील, लक्ष्मीकांत बांबोडे, प्रशांत शेंडे, माधुरी वर्षा पाटील, उज्वला खोडे, ज्योती डोंगरे यांच्यासह इतर नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व खंड विकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

