✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
साताराः- जील्हातून एक मनहेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. विवाहाला 10 वर्ष लोटूनही मूल होत
नसल्यामुळे एका विवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना वाई तालुक्यातील कणूर
गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा
राजपुरे अशी मृतांची दाम्पत्याची नावे आहेत.
काय आहे घटना…!
विवाहित दाम्पत्याचे लग्नाला दहा वर्ष झाले. पण त्यांना मुल बाळ झाल नाही. आपला वारस पुढे चालू शकणार नाही त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात मानसिक स्थिती खराब झाली होती. आज नाही तर उद्या आपल्याला मुल होईल या आशेवर ते जगत होते. मूल होत नसल्याने वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, त्यालाही यश आले नाही. अखेर या दुःखातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दोघांनीही राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तानाजी राजपुरे आणि त्यांची पत्नी पुजा हे दोघंही
अनेक दिवसांपासून मूलासाठी प्रयत्न करत होते.
वैद्यकीय उपचारांनाही यश न आल्याने दोघांनी जगाचा
निरोप घेतला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास
करत आहेत.

