Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 24, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झाले 310 कोटी 98 लक्ष रुपये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर,दि.23 सप्टें:- जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला. या नुकसान भरपाईसाठी जिल्ह्याला आता 310 कोटी 98 लक्ष 914 रुपयांचा निधी 22 सप्टेंबर 2022 रोजी प्राप्त झाला आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीकरीता बाधित शेतक-यांना मदत देण्यासाठी 302 कोटी रुपयांची आणि वाढीव 8 कोटी 95 लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याला आता 310 कोटी 98 लक्ष 914 रुपये प्राप्त झाले आहे.

यात बल्लारपूर तालुक्यासाठी 8 कोटी 81 लक्ष रुपये, ब्रम्हपूरी तालुक्यासाठी 24 कोटी 34 लक्ष, नागभीड 1 कोटी 6 लक्ष, चंद्रपूर 20 कोटी 95 लक्ष, चिमूर 41 कोटी 68 लक्ष, सिंदेवाही 51 लक्ष, गोंडपिपरी 9 कोटी 64 लक्ष, पोंभुर्णा 5 कोटी 86 लक्ष, मूल 17 कोटी 40 लक्ष, सावली 16 कोटी 5 लक्ष, जिवती 10 कोटी 86 लक्ष, कोरपना 13 कोटी 2 लक्ष, राजुरा 16 कोटी 25 लक्ष, भद्रावती 45 कोटी 26 लक्ष आणि वरोरा तालुक्यासाठी 79 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

सदर निधी तहसीलदार यांना तालुकानिहाय अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. तहसीलदार यांनी शासन निर्णय व शासन पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार अटी व शतीच्या अधीन राहून निधी तातडीने वितरीत करावा. सदर रकमेचे वाटप पूर्ण झाल्यानंतर रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे एकूण 2 लक्ष 21 हजार 900 हेक्टर क्षेत्रावरील शेतमालाचे नुकसान झाले होते. यात बाधित शेतक-यांची संख्या 2 लक्ष 30 हजार 362 असून एकूण बाधित गावांची संख्या 1382 आहे.

Previous Post

यवतमाळ: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकारी यांची भेट, एक लाखाची केली आर्थिक मदत.

Next Post

नाशिक जिल्हात 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली सापडल्याने खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक जिल्हात 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली सापडल्याने खळबळ.

नाशिक जिल्हात 65 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाजवळ लिंबू, अगरबत्ती, पेट्रोलची बाटली सापडल्याने खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In