रवींद्र भदर्गे जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे भांडे घासण्याची पावडर विकण्यासाठी तांड्यावर आलेल्या तिघांना चोर समजून जमावाने लोखंडी पाईप, लाठी, काठी, पट्टे, दगड लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले.
जालना येथील गुळखंड तांडा भागात घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून परतुर पोलीस स्टेशन मध्ये गावातील 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमध्ये मारहाणीत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
चोर समजून बेदम मारहाण जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गुळखंड तांडा येथे सोमवारी सायंकाळी 3 जणांना चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. लाठ्या काठ्या, पट्टे, लोखंडी पाईप, दगड, लाकडी दांडे आणि लाथा बुक्क्यांसह जमावाने या तिघांना फोडून काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी परतुर पोलीस स्टेशन मध्ये 45 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या मारहाणीत तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असून गुळखंड तांड्यावर मोठा जमाव होता. आरोपींमध्ये दोघांनी या तरुणांभोवती लोकांची गर्दी जमवत तुम्ही चोर आहात असा ओरडा केला. त्यानंतर तिघांनाही जमावाने जबर मारहाणीत जखमी केले.

