अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १८ जाने:- सावनेर येथील क्रीडा ग्राउंड येथे १८ जानेवारीला सकाळी ६ ते ११ वाजता पर्यंत सावनेर उपविभागाअंतर्गत सावनेर कळमेश्वर पोलीस महा मॅरेथॉन २०२५ एक धाव जागृत ते साठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
सदर मॅरेथॉन स्पर्धा ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, सायबर क्राईम, महिला विरुद्ध घडणारे गुन्हे डायल ११२, डायल १९३०, रस्ते सुरक्षा, पोलीस काका / पोलीस दीदी, नशा मुक्ती, नवीन कायद्याचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच लहान मुला मुलींना पोलीस जवळचे वाटावेत या अनुषंगाने मॅरेथॉन घेण्यात आली आहे होती.
सदर स्पर्धेमध्ये 3 किलोमिटर 13 वर्ष वयोगट मुलामध्ये: प्रथम हर्ष ढोबळे ७०००/- रुपये, दुसरा लक्ष पटेल ५०००/- रुपये, तिसरा नैतिक बगमार ४०००/- रुपये 3 किलोमिटर 13 वर्ष वयोगट मुलीमध्ये: प्रथम श्रावणी लसंते ७०००/- रुपये, दुसरी गार्गी सतकार ५०००/- रुपये, तिसरी जानवी कातरमल ४०००/- रुपये. 3 किलोमिटर ५० वर्ष व त्यावरील वयोगटात: प्रथम घनश्याम पद्मगिरवार ७०००/- रुपये, दुसरा चंदू भोंगाडे ५०००/- रुपये, तिसरा नागोराव भोयर ४०००/- रुपये तसेच महिला श्रीमती शारदा भोयर ७०००/- रुपये. 5 किलोमिटर 14 वर्ष व 17 वर्ष वयोगटामध्ये प्रथम प्रणय उपासे ११०००/- रुपये, दुसरे प्रदुन्य खोंडे ७०००/- रुपये, तिसरा क्रमांक आदित्य नागेश्वर ५०००/- रुपये, मुलींमध्ये पहिली जानवी बावने ११०००/- रुपये, दुसरी हिमांशी बावणे ७०००/- रुपये, तिसरी मानसी काठोके ५०००/-रुपये. 10 किलोमिटर 18 वर्ष व त्यावरील पुरुष: प्रथम राजन यादव २१०००/-रुपये, दुसरे सौरव तिवारी १५०००/- रुपये, तिसरे कुणाल वाघ १००००/- रुपये. तसेच महिला प्रथम प्राजक्ता गोडबोले २१०००/-रुपये, दुसरी रिया धोतरे १५०००/-, तिसरी मिताली भोयर १००००/-रुपये. याप्रमाणे स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली.
सदर स्पर्धा ही जनजागृती करण्यासाठी घेण्यात आली असून ग्राउंड मध्ये जागृतीसाठी फ्लॅग लावण्यात आले होते. त्यावेळी सावनेर कळमेश्वर करवत खापा परिसरातील खेळाडू व नागरिक सदर स्पर्धेत भाग घेण्यास पाहण्यास आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटनास आशिष देशमुख आमदार सावनेर विधानसभा क्षेत्र, रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, एस. आर. भरड दिवाणी न्यायाधीश सावनेर, एस. के. सरदार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सावनेर, एन.व्ही. रणधीर न्यायाधीश सावनेर, आर. एल. राठोड न्यायाधीश कळमेश्वर, एस. एम. गाडे न्यायाधीश सावनेर, पूजा गायकवाड पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण, रवींद्र मानकर पोलीस निरीक्षक सायबर सेल, अजय मानकर वेल्फेअर शाखा, ओम प्रकाश कोकाटे गुन्हे शाखा हे आले होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अनिल मस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व उमेश पाटील पोलीस निरीक्षक सावनेर, मनोज काळबांडे पोलीस निरीक्षक कळमेश्वर, विशाल गिरी पोलीस निरीक्षक खापा, अनिल राऊत सपोनी केळवद यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

