मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राम, कृष्ण, व शिव हें मूल्याचे प्रतीक असून ते एक विचारधारा तयार करून गेले. आपण स्वतःला सशक्त तयार करून मुल्याच निर्माण करा व त्याचे भवन बनविल्यास देश मंजूबत होईल असे प्रतिपादन माजी खा. राकेश सिन्हा यांनी दि. 17 जानेवारीला येथील सभेत केले. ते प्रोग्रेसीव्ह एज्युकेशन सोसायटी व भारतीय युवा संस्कार परिषदेच्या संयुक्त वतीने आयोजित स्व. भा. ल. भीमनवार व स्व. रमेशकुमार गोयनका यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
यावेळी उमेद संकल्प व संजीवनी संस्था रोठा (वर्धा) च्या संचालिका मंगेशी मून यांना जिल्हा युवा गौरव संकल्प सेवाभाव पुरस्कार -२०२५ हा अतिथीच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजिका प्रेमलतादेवी मोहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, गोकुलदास राठी, श्याम भीमनवार, डॉ. शरद कुहीकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रमेश धारकर यांनी केले. या प्रसंगी नवनिर्वाचित राज्यमंत्री पंकज भोयर, आ. कुणावार, आ. बकाणे, आ. वानखेडे यांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खा. सिन्हा यांनी आपल्या उदबोधनातून सांगितले कीं रिपाईचे माजी खा. स्व. बाळासाहेब साळूंखे यांचे आत्मचरित्र संपादित करण्यात माझा हात लागला हें माझे भाग्य आहे. या चरित्रात स्व. साळूंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात देशातील अनेक परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा झाली व त्याचे साक्षीदार स्वतः स्व. साळूंखे होते हा मोठा गौप्यस्फ़ोट यावेळी खा. सिन्हा यांनी केला. इतिहासाच्या पोटात अनेक नायक व घटना लपून असून त्या जनतेसमोर यायला पाहिजे तरच एका उत्तम सुसंस्कारीत समाजाची निर्मिती शक्य आहे.
समर्थ रामदास यांनी दासबोधातून पुरुषार्थची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कारण कोल्हे कुत्रे हें केवळ समाजाच्या अध:पतनाचे कारण आहे. त्यासाठी चारित्र्यवान होता आले पाहिजे व मूल्यावर आधारित समाजाची निर्मिती झाल्यास भारताचा उद्धार होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे संचालन मनीषा कोंडावार यांनी केले. आभार प्रदीपकुमार नागपूरकर यांनी मानले.
यावेळी जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, पिवीचे महा प्रबंधक भूपेंद्र शहाणे, वासुदेव गौळकार, अशोक सोरटे, राजेश महाराज शेन्डे, राजु राठी, बळीराम चव्हाण, संजय देशपांडे, अजय वानखेडे, रिपाईचे शंकर मुंजेवार, आंबेडकर विचारवंत रामभाऊ मेंढे, वरुडचे माजी सरपंच दिनकर आंबूलकर व मान्यवर उपस्थित होते.

