अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भोई मच्छीमारांचे कैवारी विमुक्त भटक्यांच्या आरक्षणाचे प्रणेते माजी खासदार स्व जतीरामजी बर्वे यांची चाळीस वी पुण्यतिथी भोई पुरा हिंगणघाट येथे महाप्रसादचे वाटप करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
स्व जतीरामजी बर्वे यांनी १९७४ ला भोई भटक्या जमाती ना आरक्षण मिळवून दिले होते तेंव्हा पासून भोई समाजाचा शैक्षणिक व नौकरी मध्ये तसेच पदोन्नतीसाठी बऱ्याच भोई समाजातील महिला पुरुष यांनी लाभ घेतला. परंतु ज्यांनी लाभ घेतला अशे बरेच नौकरदार वर्ग अशा कार्यक्रमा पासून दुर राहतात याची खंत आहे. थोडे नौकरदार वर्ग आवर्जून उपस्थित राहतात.
नागपूर शहरातील झिरो माईल येथील स्व. जतीरामजी बर्वे यांच्या पुतळ्या जवळील मच्छीमार संघाची वास्तु पाडुन सदर जागा बीजेपी सरकारने मेट्रो चे नावाखाली हस्तगत केली ती जागा सरकारने परत करावी असे मागणी या वेळी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला उपस्थित राजु मन्ने, मधुकर बावणे, अशोक मोरे, अनिल ढाले, शेखर दाते, प्रदीप बावणे, राहुल पडाल, अभिलाश पडाल, शंकर मोरे, सचिन मोरे, अनिल मोरे, महादेव कोल्हे, नरेंद्र मोरे, राजु ढाले, रेखा मोरे, अंकीता कोल्हे, शितल सातघरे, पत्राबाई तुमसरे, आरती मोरे, प्रती मोरे, आशु कापटे, कल्पना कोल्हे इत्यादीची उपस्थिती होती.

