“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अंतर्गत तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी, हिंगणघाट मध्ये विविध उपक्रम.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य शासन ने १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने. या “वाचन संकल्प “निमित्ताने तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ग्रंथालय विभाग द्वारा ‘वाचन पंधरवडा’ आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमाचा भाग म्हणून ग्रंथालय मध्ये ग्रंथ प्रदर्शनी व लेखकाची भेट आणि सामुहीक वाचन, ग्रंथालय स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य मार्गदर्शक तुळसकर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे उदघाटक म्हणून विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश रोडे तसेच प्रमुख पाहुणे तुळसकर इन्स्टिटयूट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि प्राचार्य राकेश साटोणे व फार्मसी कॉलेज चे विभाग प्रमुख प्रा. प्रदीप रघाटाटे, ग्रंथालय प्रमुख हर्षल कोरे उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वल करून करण्यात आली त्या नंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमार्गदर्शक प्राचार्य डॉ. महेंद्र गुंडे कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले कि पुस्तके आपल्याला शिकण्यासाठी एक नवीन संधी देत असते. पुस्तके वाचल्याने आपले ज्ञान वाढते. आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धिमत्ता अधिक वाढते. तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन संस्कृती जोपासने अत्यंत महत्त्वाचे असुन महाविद्यालयातील मुलं तर वाचनाकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वाचन ही एक सुंदर कला आहे आणि प्रत्येकाने ती जोपासावी असे विचार ‘वाचन पंधरवडा’ कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रम चे उदघाटक म्हणून लाभलेले प्राचार्य नितेश रोडे यांनी, आजच्या आधुनिक युगातही ग्रंथालये विकसित झालेली आहेत. पण आज या पुस्तकांची जागा इंटरनेटने घेतली आहे. परंतू विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती हळूहळू नष्ट होत आहे. तर प्रा. प्रदीप रघाटाटे यांनी वाचाल तर वाचाल, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांवर प्रकाश टाकुन वाचनाच्या माध्यमातून मानवाचे जीवन घडू शकते यावर मार्गदर्शन केलं.
या वेळी प्रा.राकेश साटोणे, ग्रंथालय प्रमुख हर्षल कोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. कायक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजु तन्ना यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शीतल पाटील ने केले. या कार्यक्रमाला प्रा. राकेश जोशी, प्रा. पायल बकाने, प्रा. प्रणय बुरीले, प्रा. नयनतारा पाचपोर, प्रणय भेंडे, मोनिका वारके, साक्षी देशमुख, पराग भाईमारे, सोनाली बलखंडे, मोनिका भोयर, हर्षल साटोणे. व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू काळे, प्रिया वाजेकर, मयूरी बोधने, रुपाली राऊत, सीमा वानखेडे यांनी प्रयत्न केले.

