पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- संपूर्ण विश्वात ग्रेग्रोरियन कैलेंडर व कालगणना प्रचलित आहे. भारतीय कालगणना ही वैज्ञानिक व ग्रह नक्षत्रांवर आधारित असून, सामान्य लोकांना याची वैज्ञानिक माहिती नसल्यामुळे प्रचलना मध्ये व प्रसिद्ध नाही, सामान्यपणे तिथी ही जत मुहूर्ते व सणांच्या माहितीसाठी भारतात वापरली जाते.
अमावस्या, पौर्णिमा, कोजागरी, विजयादशमी, चतुर्थी, एकादशी यांची नांवे प्रामुख्याने लोकांना माहिती असतात. परंतु यांची वैज्ञानिकता किती प्रचंड आहे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने तिथी व नक्षत्र यंत्राचे संशोधन व स्वयंसंचालन आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क, चौकी, कान्होलीबारा, हिंगणा येथे व्हीएनआयटी नागपूरच्या माध्यमातून करण्यात आले, असे विशेषपणे नमूद करून व्हीएनआयटीचे क्षयरेक्टर डॉ. प्रा. प्रेमलाल पटेल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
जेव्हा सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात म्हणजेच चंद्र आपणास दृष्टिगोचर होत नाही त्याला अमावस्या असे म्हणतात, चंद्र पृथ्वीभोवती एक परिक्रमा जेव्हा पूर्ण करतो, त्यास एक महीना असे म्हणतात. त्याचप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करते त्यास एक वर्ष असे म्हणतात. या ग्रहांच्या भ्रमणीनुसार दिवस, वार, महिना व वर्ष यांची उत्पत्ति भारतीय ऋषिनी केली व ती प्रत्येक देशात जशीच्या तशी आजही वापरण्यात येते. जेव्हा चंद्र 12° सूर्याच्या पुढे सरकतो त्या काळास तिथी असे म्हणतात. याप्रमाणे प्रत्येक 12° अंशाला एक तिथी तयार होऊन संपूर्ण एका चंद्राच्या पृथ्वीभोवती परिभ्रमणांत म्हणजे 360° अंशात 30 तिथी तयार होतात. यावरून 30 दिवसांचा महिना हा सिद्धांत प्रचलनात आला आहे.
तिथी ही चंद्र भ्रमणावर आधारित असल्यामुळे चंद्राच्या शीघ्र किंवा मंद गतिनुसार तिथीचा काळ ठरतो. कधी 18 तास तर कधी 27 तास असा हा कालावधी असतो, हे यंत्राद्वारे तयार करणे हे अत्यंत कठीण कार्य व्हीएनआयटी नागपूरच्या तज्ञ प्रोफेसर्स व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात करून दाखविले. या संशोधनाला एक वर्ष लागले. हे यंत्र आपणांस श्रीक्षेत्र चौकी कान्होलीबारा हिंगणा येथील आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्कमध्ये बघायला मिळणार आहे येथे नक्षत्र यंत्रावेसुद्धा ग्रहांच्या भ्रमणांनुसार कम्प्युटर व सॅटेलाईटद्वारे व्हीएनआयटी नागपूरच्या माध्यमातून संशोधित करण्यात आले आहे. मार्च 2024 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या चौकी येथील भेटीत या कार्याची माहिती तत्कालीन डायरेक्टर डॉ.प्रा. प्रमोद पडोळे यांनी दिली व या कार्याला शुभेच्छासुद्धा डॉ. मोहन भागवत यांनी दिल्यात.
श्रीक्षेत्र चौकी येथे वार यंत्र, श्रीयंत्र, गुरु बृहस्पती मंदिर, शनि मंदिर व सूर्य घड़ी हे पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षकांना हे आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क वैदिक विज्ञान व आधुनिक विज्ञानाची माहिती देणारे विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ आहे. आतापर्यंत या विषयावर कुठेही संशोधन झाले नाही. हे संशोधन विदर्भ वासियांसाठी कौतुकाची गोष्ट आहे. याचे लवकरच पेटेंट होणार असून या संशोधनाचे अहवाल जगभरात लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. आपणसुद्धा येथे नक्की भेट दयावी असे आवाहन डॉ. प्रा. प्रेमलाल पटेल, डॉ.प्रा. दिलीप पेशवे व आचार्य भूपेश गाडगे यांनी पत्रकारांना केले.
या संपूर्ण यंत्राच्या संशोधित करण्याच्या कार्यास व्हीएनआयटी नागपूरचे प्रा. डॉ. दिलीप पेशवे, प्रा.डॉ. शितल राऊत, प्रा.डॉ. जयश्री सातपुतळे, प्रा.डॉ. अश्विन ढबाले, श्री. आर्या देवर्ला, श्री. ऋषिकेश पोतदार, तसेच या यंत्राची संकल्पना आचार्य भूपेश गाडगे यांची असून आचार्य पूजा गाडगे, आचार्य किशोर पवनीकर, श्री. देवेंद्र दायरे, श्री. रमेश मिश्रा, श्री रामदास फुलझेले, श्री श्रेयस गाडगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थापक
आर्यभट्ट अॅस्ट्रॉनॉमी पार्क,
श्रीक्षेत्र चौकी, कान्होलीबारा, हिंगणा

