प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सहकार नेते हिंगणघाट नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दिनांक 21 जानेवारी रोजी हिंगणघाट येते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पक्ष प्रवेश केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शरद शहारे तसेंच प्रदेश ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस दुर्गाताई ठाकरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश चांभारे, जिल्हा सचिव गजानन लाखे, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष शरीप शेख, ग्रामीणचे अध्यक्ष मोरेश्वर शेंडे, विठ्ठल पोहने तसेच निलेश फरकाडे, दिनेश गुजरकर, पंकज पर्बत यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचाली बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

