प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- बोरगाव मेघे वॉर्ड क्र.3 मधील बुद्धविहार परिसरात अंबिका सोशल फाउंडेशन शाखेच्या वतीने स्नेहमीलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंबिका हिंगमीरे याना अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अंबिका सोशल फाउंडेशनच्या सीमा कोपनाके व कांचन सुखदेवे या देखील उपस्थित होत्या.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व भगिनींशी संवाद साधला. यावेळी अनेक महिला भगिनींनी अंबिका फाउंडेशनच्या कार्याची प्रेरणा घेऊन फाउंडेशनसोबत जुडण्याचा संकल्प केला. या स्नेहमिलनमध्ये अनेक महिला भगिनींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आले. ज्योत्स्ना वासनिक यांच्या सूत्र संचालनाने या सोहळ्याला खरी रंगत आली. सर्वांना तिळगुळ व भेटवस्तू देऊन या स्नेहमीलन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

