अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक आगरकर विद्या भवन येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धां व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 23 जानेवारी रोजी क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नांदगावचे प्रतिष्ठित नागरिक विठ्ठलराव कुकडे तथा विलासराव पाटील माजी उपसरपंच हे उपस्थित होते. त्यांनी मुलांना खेळाचे महत्व समजावून सांगितले.
दिनांक 24 जानेवारी रोजी साहित्य दिन साजरा करण्यात आला, ज्यामध्ये भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी गजानन बाळबुधे पोलीस पाटील वालधूर व हेमंत शिंदे सरपंच वालधूर हे होते. परीक्षक म्हणून उकेकर सर व सावरकर सर प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यानंतर दिनांक 25 जानेवारी रोजी पालकांचे विविध सादरीकरण करण्यात आले. ज्यात अनेक पालकांनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रणाली सायंकार व डॉ. रूपाली कोठारी, प्यारू भाई व दिलिप कहुरके उपस्थित होते. त्यानंतर मुलांनी लावलेल्या विविध खाद्य स्टॉलचा सुद्धा उपस्थितांनी आस्वाद घेतला.
दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यकमाचे उद्घाटन म्हणून श्रीमती दांडेकर वीरमाता व पिता श्री व श्रीमती कोरे आणि माजी सैनिक पुंडलिक बकाने उपस्थित होते. यावेळी भारतीय राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करून मां

