अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ते टेंभा रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर विरोधात पोलिसांनी कारवाई करीत ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या कारवाईमुळे रेती उत्खनन करून वाहतूक करण्याऱ्यामध्ये भीती पसरली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २७ जानेवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पोलिसांना वडनेर ते टेंभा रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ बिजी १२८६ अडवून पाहणी केली असता त्यात वाळू आढळून आली.
यावेळी चालकास वाळू वाहतूकी संबंधित परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही कागदपत्रे नव्हते. यावेळी पोलिसांनी वाळू सह ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून यासंबंधी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

