अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथील माहेश्वरी कुकुर्डे ने स्वामी विवेकानंद ज्ञान प्रसारक मंडळ पडोली चंद्रपूर तर्फे 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित स्पर्धेत यश संपादन केले. या स्पर्धेत रांगोळी स्पर्धा व नृत्य स्पर्धा या दोन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बंडूजी सोमनकर तसेच विनोद खडसे तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात सुंदर अशा रांगोळी स्पर्धेत पहिलं पारितोषिक कुमारी माहेश्वरी विठ्ठल कुकुर्डे राहणार पिपरी पोहणा तालुका हिंगणघाट ने भारताच्या काही वीर जवानांचे स्मरण करून ती रांगोळी काढली. ज्यात तिने पहिला क्रमांकाचे पारितोषिक मिळवलं. तसेच तीन बक्षीस व एक प्रोत्साहन पर बक्षीस मिळवले. यात ट्रॉफी, रोख रक्कम देण्यात आली. या यशस्विते बद्दल शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. तिला मिळालेल्या प्रथम क्रमांकाने आई वडिलांनी आनंद व्यक्त केला.
माहेश्वरी विठ्ठल कुकुर्डे यांना रांगोळी काढण्याची आवड लहान पणा पासूनच होती, तिने सांगितले की माझे स्वप्न पोलीस मध्ये यायची तयारी सुरू असल्याने, माझी जिद्द पूर्ण करणार असे तिने सांगितले. माहेश्वरी कुकुर्डे पोलीस भरतीचा अभ्यास दिवस रात्र एक करून मेहनत करून जिद्द चिकाटी ने पोलिसात भरती होणार असल्याचे सांगितले. आणि आई वडिल आणि भाऊचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

