अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २८:- कळमेश्वर येथे यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून उत्पन्नात घट झाली आहे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे शासनाने सोयाबीन पिकाचे हमीभाव प्रतिक्विंटल ४८९२ रू. व भावांतर योजना लागू केली असून ती कागदावरच आहे त्याचा मात्र शेतकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाही शेतकऱ्यांची सोयाबीन हे बाजार समितीमध्ये ३२०० ते ४३०० रू. व्यापारी खरेदी करत असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे.
याबाबत दि.२९/११/२४ ला कळमेश्वर येथील तहसीलदार यांचेमार्फत केंद्रीय कृषिमंत्री भारत सरकार यांना संघटनेतर्फे लेखी निवेदन देण्यात आले परंतु त्यावर कुठलीही प्रकारची आज पावतो कारवाई झालेली नाही शेतकऱ्यांना शेती पिकाला उत्पादन खर्च जास्त येत असून शासन स्वामीनाथन आयोगानुसार पिकाला योग्य भाव देत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यानां उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून शासन त्यांना आत्महत्या करण्याकरिता प्रवृत्त करीत आहे या गंभीर बाबीची शासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.
याबाबत दि.25 जानेवारी 2025 रोजी स्थानिक प्रशासनातील कळमेश्वर येथील तहसीलदार रोशन मकवाने तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संकेतस्थळावर लेखी निवेदन शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आले. शेतकऱ्यांना हमीभाव व भावंतर योजने अंतर्गत फरकाची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुरलीधर ठाकरे, संजय चौधरी, महेंद्र सातपुते, मनीष शेंडे, नामदेव खडसे, सिद्धार्थ बागडे प्रामुख्याने उपस्थित होते.

