अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट द्वारा संचालित ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमीत्त ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. अभय दांडेकर मुख्याध्यापक ब्रिलीअंट स्कूल हिंगणघाट तर अतिथी म्हणून प्रा. अजय बिरे मराठी विभाग प्रमुख मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट, डॉ. सुनंदा गिरडे ग्रंथपाल मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजन करून करण्यात आली. या प्रसंगी डॉ. सुनंदा गिरडे यांनी ग्रंथालयातील ग्रंथांच्या वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली, मार्गदर्शक प्रा अजय बिरे यांनी मराठी भाषा ही जिवन भाषा आहे त्यामुळे सर्वांनी मातृ भाषेवर प्रेम करून मातृभाषा वृध्दींगत करण्याकरिता नेहमी प्रयत्नरत राहावे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रा अभय दांडेकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगताना मराठी भाषेचे वैशिष्ट्य सर्वांसमोर मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका लोणकर तर आभार शिक्षिका विद्या येनोरकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांनी सहकार्य केले.

