अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- २९ जानेवारी २०२५ गोमुख उच्च माध्यमिक विद्यालय तिष्टी बु येथे वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. २५ जानेवारी ते २७ असे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये क्रीडा स्पर्धा, चित्रकला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शनी, गीत-गायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
२५ जानेवारी ला कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर व सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्था नांदागोमुख चे उपाध्यक्ष लीलाधरराव जीवतोडे यांच्या हस्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय पंधरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चित्रकला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शनी, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अनिल मस्के यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्नाची आवश्यकता असते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा आपल्या प्रयत्न व मेहनतीच्या भरोशावर चांगले यश कशा प्रकारे प्राप्त करू शकते. याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्था नांदागोमुख चे उपाध्यक्ष लीलाधरजी जीवतोडे यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पंधरे, तिष्टी बु येथील सरपंच मंगला घोरमारे व गावातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद सर्व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला.
२७ जानेवारी ला बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या बक्षीस वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनरावजी मोवाडे तर मुख्य अतिथी म्हणून सरस्वती प्रासादिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष लीलाधरजी जीवतोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कळमेश्वर श्री. कच्छवाह हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच गावातील वरिष्ठ नागरिक कृष्णाजी लखमापुरे, तिष्टी बु येथील सरपंच मंगला घोरमारे व शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पंधरे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या तीन दिवसीय सोहळ्यामध्ये शाळेत ज्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यां करता स्नेहभोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. अशाप्रकारे गोमुख उच्च माध्यमिक विद्यालय तिष्टी बु येथे तीन दिवशीय घे भरारी २०२५ या वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पंधरे यांनी केले व संचलनाची जबाबदारी रंजीता जोगी तसेच राजेंद्र कुथे व महेंद्र सातपुते यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता रंजीता जोगी, राजेंद्र कुथे, हेमचंद्र जीवतोडे, रोशन मिलमिले, वैभव पोचले, राजेश मारबते, कु.स्नेहा देवलकर, महेंद्र सातपुते व संगीता मिलमिले, शिक्षकेतर कर्मचारी सुनील ठाकरे व बंडूभाऊ पाटील या सर्वांनी अथक प्रयत्न केले.

