अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथील राज्यशास्त्र विभागातर्फे जागतिक मतदान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त रैली चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. उमेश तुळसकर प्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट, प्रा.अभय दांडेकर तसेच मातोश्री आशाताई कुणावार महिला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सपना जयस्वाल व राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतिभा दुबे, कला विभाग प्रमुख प्रा.भाग्यश्री साबळे, प्रा.नवले, प्रा.इंगळे, प्रा.घाटे यांची उपस्थिती होती. डॉ. सपना जैसवाल मैडम यानी मतदानाचे महत्व विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रा. प्रतिभा दुबे यांनी केले, या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनीनी सहभाग घेतला.

