अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तळेगाव (टालाटुले) येथे घरातून पोलिसांनी 15 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची माहिती 31 जानेवारी सायंकाळी 7.00 वाजता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
अल्लीपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तळेगाव (टालाटुले) येथील मिलिंद इंगळे याने आपल्या घरी अमली पदार्थ गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याची साठवनुक करून ठेवली आहे. या माहितीच्या आधारे ठाणेदार प्रफुल डाहुले हे पोलीस स्टॉप सह तळेगाव (टालाटुले) येथे पोहचुन मिलींद इंगळे याचे राहते घराची पंचासमक्ष रीतसर झडती घेतली असता, कवेलु असलेल्या रूममध्ये एका पोत्यात प्लास्टीक पन्नीमध्ये गुंडाळुन 1.375 किलो ग्राम वजनाचा गांजा किमंत 15,000 रुपये किमतीचा मिळुन आला. यावर पोलिसांनी संपुर्ण कार्यवाही करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधिक्षक राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रफुल डाहुले, रवी वर्मा, राहुल नव्हाते, सतिश हांडे, अंमलदार विठ्ठल केंद्रे यांनी केली.

