अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ फेब्रु:- सारस्वत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावनेर नगरी मध्ये श्री.चतुर्मुख शिव ब्रम्हलिंग (जलधारी) यांची प्राणप्रतिष्ठा 31 जानेवारी शुक्रवारला दुपारी 12.30 वाजता प. पू. गुरुवर्य श्री.सेनाड महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड नं. 4 साई मंदिर जवळ, श्री.प्रभू विश्वकर्मा मंदिर येथे श्रीमान प्रदीप सुखदेवजी डांगे व सौ. रजनी प्रदीपजी डांगे यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते.
चतुर्मुख शिवब्रम्हलिंग (जलधारी) यांची पालखी सकाळी 9.00 वाजता श्री.प्रभू विश्वकर्मा मंदिर येथून निघून सावनेर भ्रमण करीत 12.30 वाजता विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला.
प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त श्री. शिवमहापुराण अमृतकथाचे आयोजन 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. श्री. शिव महापुराण कथा व्यासपीठाचार्य गुरुवर्य ह. भ. प. श्री. अनिल महाराज आहेर नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री. शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री.प्रभू विश्वकर्मा मंदिर सावनेर संचालक मंडळ यांनी केले आहे.

