स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण मनात शिकण्याची जिद्द असणाऱ्या विद्यार्थांना तालूका गोंडपिपरी भाजपा यूवक पदाधिकाऱी अमर बोडलावार यांच्याकडून शालेय गणवेष व पूस्तकांची देऊन निभवला मानव धर्म. आज मनुष्याला पुढे जाण्यासाठी शिक्षण फार मोलाचे असते. कुणी विद्धार्थी या शिक्षणा पासून वंचित असेल तर त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांचा विकास खुटतो. त्यामुळे विद्धार्थ्या शिक्षणात मदत करणे हे खरा सेवा धर्म आहे.
न्यू दान पब्लिक स्कूल चंद्रपूरचे विद्यार्थी असलेले रेहानअली वर्ग 10 वजित अली वर्ग 8 गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव रहिवासी असून यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची पण मनात शिकण्याची जिद्द असल्यामुळे त्यांना शालेय गणवेष व शालेय पूस्तकांची मदत हवी होती, हि माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावले व त्यांना शालेय गणवेष व पूस्तक देऊन त्यांची गरज पूर्ण केली.
अमर बोडलावार यांच्याकडून गरीब विद्धार्थ्याला देण्यात आलेल्या मदतीमुळे त्यांचं सर्विकडे कौतुक करण्यात येत आहे.