श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- जिल्हा रुग्णालय बीड येथील नेत्रविभाग म्हटलं की नेत्रतज्ञ डॉ. राधेशाम जाजु यांचे नांव पुढे येते, कारण जिल्हा रुग्णालय नेत्र विभागात काम करणारे तसेच इतर बाबीमध्येही डॉ. जाजु यांचे नांव प्रसिद्ध आहे. सेवाभाव हा ज्यांच्या मनामध्ये व स्वभावामध्ये आहे तोच खरा डॉक्टर असं म्हणायला काहीच हरकत नाही. कुठलेही मदत कार्य असो त्याकामास जिल्हा रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ. राधेशाम जाजु हे नाही म्हणत नाहीत आणि अगदी आनंदाने ते काम करतात. कुठल्याही रुग्णाने त्यांना डोळयाच्या शस्त्रक्रियेबद्दल विचारले तर ते शस्त्रक्रियेसाठी कधीही आज करू उद्या करु असे न म्हणता लगेच करु असे म्हणतात. ते शासकीय कामाला नेहमी प्रथमस्थान देवून काम करतात मग दिवस असो वा रात्र त्यांचे काम चालू असते.
डॉ. जाजू त्यांनी नेत्रशस्त्रक्रियेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीडमध्ये पहिला तर राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. शासकीय सेवेमध्ये नेत्र शस्त्रक्रियेत त्यांचे बीड जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी त्यांना दिलेल्या वार्षीक उद्दीष्टापैकी म्हणजे ७०० नेत्रशस्त्रक्रीया पैकी त्यांनी पाच महिन्यातच ६२२ एवढ्या नेत्रशस्त्रक्रिया करून आतापर्यंत वर्षाचे ८९% काम पूर्ण केले आहे. शासनाने त्यांचा राज्यात नेत्रशस्त्रक्रिया करण्यामध्ये पाचवा क्रमांक आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल डॉ. जाजु यांचे सर्व जिल्ह्यातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.

