मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदेवाही:- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मेंढा माल येथील एका 55 वर्षीय व्यक्तीने विहिरी उडी घेतली आत्महत्या केली आहे. चंद्रशेखर गुरनुले असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, ते सामाजिक सलोखा बाळगणारे व्यक्ती म्हणून सिंदेवाही तालुकामध्ये प्रसिद्ध होते. तसेच ते सिंदेवाही सहकारी भात गिरणीचे माजी संचालक सदस्य होते.
मागील दोन महिन्यापासून चंद्रशेखर गुरनुले यांना गूढग्याचा त्रास सुरू झाल्याने व तो त्रास सहन होत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले व स्वतःच्या विहिरी मध्ये आज पहाटेच्या सुमारास सकाळी साडे पाच ते सहा वाजताच्या दरम्यान उडी घेऊन आपली जिवन यात्रा संपवली. त्यांचा मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असून बराच मोठा आप्त परिवार आहे.
या घटनेची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मृत्युदेह विहिरीच्या बाहेर काडून मृत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालय पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक फौजदार सोनवाने व देशमुख, आणि पोलीस अंमलदार चाचेरे चालक पोलीस अंमलदार मेश्राम हे करत आहें.

