मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-हिंगणघाट शहराच्या मध्यभागातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 वर हिंगणघाट शहरातील कलोडे चौक व उपजिल्हा रुग्णालय जवळ या दोन्ही ठिकाणी मोठा उतार असल्यामुळे दोन्ही बाजूनी भरवेगाने येणाऱ्या वाहनामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आल्यामुळे येथील अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे निवेदन सादर केले होते.
दोन वर्षापूर्वी श्री. गडकरी हें हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एका कार्यक्रमाला आले असतांना हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी या दोन्ही ठिकाणी उड्डाणं पूल तयार करून देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या व अन्य सामाजिक संघटनांनी केलेल्या विंनतीला मान देत नितीन गडकरी यांनी या दोन्ही उड्डाणं पुला साठी 75 कोटी रुपये मंजूर केले.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गचे प्रोजेक्त डायरेक्टर सी. एम. सिन्हा यांच्या मार्गदर्शना खाली श्री साई कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्त मॅनेजर शाहबाज खान यांनी हें दोन्ही पूल विक्रमी वेळात पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. या दोन्ही उड्डाणंपुला मुळे हिंगणघाट शहरातील दोन्ही बाजूच्या जनतेची उत्तम सोय होणार असल्याने अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रोजेक्त डॉयरेकटर सिन्हा, प्रोजेक्त मॅनेजर शाहबाज खान यांचे आभार मानले आहे.

