पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
ताला ठोकण्याआधी मुख्याधिकारी आले गेटमध्ये आंदोलकांशी चर्चा करायला.
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
गडचिरोली:- वंचित बहुजन आघाडी शहर शाखा गडचिरोलीच्या वतिने शहरातील समस्या सोडविण्यासाठी वांरवार निवेदन देऊनही मुजोर नगर परिषद प्रशासन ऐकत नसल्याने ताला ठोको आंदोलन करण्यात आले.
नगर परिषदेला ताला ठोकणयासाठी आंदोलक मुख्याधिका-यांच्या प्रवेशद्वारावर पोहचताच पोलिसांनी आंदोलकांना अडविले परंतु आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने स्वत: मुख्याधिकारी दारात येऊन आंदोलकंशी चर्चा केली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, महासचिव योगेंद्र बांगरे, बाशिद शेख , मालाताई भजगवळी, उपाध्यक्ष जी के बारसिंगे यांच्या कडून मुख्याधिका-यांनी समस्या ऐकून घेतल्या व शहरातल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सर्वे करण्यात येईल व येणा-या पंधरा दिवसात सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन देिल्यामूळे आंदोलक शांत झाले.
आंदोलकांनी केलेल्या नारेबाजीमूळे व हमारी मांगे पूरी करो ना-यामूळे नगर परिषद प्रशासन हादरले होते सर्व कर्मचारी बाहेर येऊन आंदोलकांच्या हालचाली मोबाईलमध्ये टिपत होते.
यावेळी मुख्याधिका-यांशी बोलतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की पंधरा दिवसात समस्या सुटल्या नाही तर आक्रमक मोर्चा काढण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा ईशाराही त्यांनी दिला.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिलीप बांबोळे, भारत रायपूरे, तुळशिराम हजारे , भोजराज रामटेके, मनिषा वानखेडे, वर्षा हलदर , मनोहर कुळमेथे, भैय्याजी आत्राम, विश्वनाथ बोदलकर ,आनंदरााव शेंडे, जोंदरू शेंडे, मलय्या कालवा, विश्वनाथ बोदलकर, गोपाळा मोटघरे, मनोज भोयर, गणेश बोगावार, सोमनाथ लाकडे, क्रिष्णा शेंडे, जावेद शेख , अज्जू पठाण, शेखलाल शेख, आकाश भरडकर, पार्वता मेश्राम लता बांबोळे, रंजना धूर्वे, प्रेमिला रायपूरे, अवी शेंडे, राजू चिकराम,रवी मोटघरे, बाबूराव मडावी,आदिसह हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

