संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- जिवती तालुक्यातील मौजा पाटण – शेनगाव सर्कल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरील लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ आदिवासी नेते भीमराव मडावी, सरपंच सीताराम मडावी, तिरुपती पोले, बंडू राठोड, कलीम शेख, अब्बास अली, सलीम शेख,आशफाक शेख, अमोल कांबळे, मारु पाटील आत्राम, नागोराव देवकते, दत्ता नंदेवार, ज्ञानोबा तेलंग, उपसरपंच गणेश शेटकर, एकलरे महाराज, थाडगे, गोविंदा चव्हाण, आनंदराव कुळसंगे यासह जिवती काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रसिद्धी प्रमुख
राजुरा विधानसभा काँग्रेस.

