उषाताई कांबळे जिल्हा सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दि. २ फेब्रुवारी २०२५ रविवार रोजी नाशिक येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या मार्गदर्शनाणे आखिल भारतीय ओबीसी सेवा संघांचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी संघाच्या कार्य प्रणाली बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गृह उद्योग व्यवसाय तसेच संबंध ओबीसी समाजाला येणाऱ्या अडचणी व दूर करण्यासाठी तसेच अनेक महत्वाचे मुद्द्यावर चर्चा मार्गदर्शन करण्यात आले व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ च्या नाशिक शहर कार्यकारिणी मध्ये सौ कल्पना सोनार (नाशिक शहर महिला मुख्य संघटक), डॉ संदीप काकड (नाशिक शहर मुख्य संघटक) सौ. सुनीता धंनतोले (नाशिक शहर सरचिटणीस) राणी कासार (पूर्व नाशिक शहर उपाध्यक्षा) दीपाली दाहीजे (पश्चिम नाशिक शहर उपाध्यक्षा), ज्योती कुपते (शहर कार्यकारिणी सदस्य) जयश्री मॅडम (शहर कार्यकारिणी सदस्य) रमेश दंडगाव्हाल( शहर कार्यकारिणी सदस्य ) याप्रमाणे मान्यवरांची निवड करण्यात आली. व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नाशिक शहरचे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

