अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरातील मनोरुग्ण सुनील अनेक वर्षापासून रस्त्यावर बेवारस फिरत होता. काही दिवसा आधी त्याचा अपघात झाल्याची माहिती हिंगणघाट शहरातील काही समाज सेवकांना मिळाली. त्याचा पायाला खूप मोठी जखम झाली होती. त्याला चालता येत नव्हते. या रेस्क्यू संघाने त्वरित त्याच्यावर उपचार केला. वेळेवर उपचार मिळाला नसता तर त्याचा पाय कापावा लागला असता. तसेच तो मनोरुग्ण असल्याने त्याला तहान -भूक लागल्या चीही जाणीव होतं नव्हती.
त्यामुळे जीवनरक्षक फॉउंडेशने सेलू (जि. वर्धा) येथील माहेर मनोरुग्ण केंद्र या ठिकाणी त्याला उपचारासाठी विचारले असता सदर संस्थेने होकार दिला.
अतिशय तापट स्वभावाचा सुनील याला रेस्क्यू करून हात बांधून त्याला गाडी मध्ये बसून सेलू येथील माहेर संस्थेत नेण्यात आले. त्या ठिकाणी संस्थेनी त्याची आंघोळ करून त्याला उपचारा साठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर तो माहेर या संस्थेचा एक अविभाज्य घटक होणार आहे.
सुनीलची अवस्था पाहून त्याच्या मदतीला धावून त्याला निवारा मिळवून देणारे, नितिन क्षीरसागर, जिवरक्षक राकेश झाडें, सूरज कुबडे, दीपक जोशी व सतीश गलांडे यांच्यावर सर्व गावातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

