अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथील सांस्कृतिक विभागाद्वारे ‘उत्सव संस्कृतीचा रंग माझ्या पांडुरंगाचा’ सांस्कृतिक महोत्सव 2025′ निमीत्त दिनांक 20 जानेवारी ते 22 जानेवारी 2025 पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नयना तुळसकर, सचिव विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट यांनी केले. दिनांक 20 जानेवारीला प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. परीक्षक म्हणून डॉ. नितीन अखुज, प्रा सदानंद सार्वे यांनी परीक्षण केले. द्वितीय सत्रामध्ये वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये परीक्षक म्हणून डॉ. मंगला खूने तसेच प्रमोद जयपुरकर यांची उपस्थिती होती. मंगला खुणे यांनी विद्यार्थ्यांना वाद-विवाद स्पर्धेचे नियम समजावून सांगितले व निकाल जाहीर केला. प्रमोद जयपुरकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी क्रीडा स्पर्धेचे व आनंद मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले.
यामध्ये धावण्याची स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, लंगडी, सॅक रेस अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विजेत्या गटांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
सांस्कृतिक महोत्सवाच्या द्वितीय सत्रामध्ये दिनांक 21 जानेवारी 2025 ला प्रथम सत्र मध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी यांची उपस्थिती होती. प्रा अभिजित डाखोरे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दर्शविली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. अतिथी म्हणून डॉ. महेंद्र गुंडे प्राचार्य तुळसकर ग्रुप ऑफ फार्मसी हिंगणघाट, प्रा. राकेश साटोणे प्राचार्य तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हिंगणघाट, नितेश रोडे प्राचार्य विद्या विकास जुनिअर कॉलेज, हिंगणघाट यांची उपस्थिती होती.
यावेळी अँड.सुधीर कोठारी यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध शिक्षण हे आवश्यक आहे व शिक्षणाला अनुभवाची जोड असणे ही आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. प्रा अभिजीत डाखोरे यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणि आजची शिक्षण पद्धती यातील फरक समजावून सांगितला. सूत्रसंचालन प्रा.अभय दांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ महेंद्र गुंडे यांनी मानले.
दिनांक 22 जानेवारीला प्रथम सत्रामध्ये प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा सखे साजणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मार्गदर्शक म्हणून सिंधी रेल्वे,समुद्रपूर, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावर, डॉ. जया तुळसकर, संचालिका विद्या विकास शिक्षण संस्था, हिंगणघाट यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूरचे प्राचार्य डॉ. किशोरचंद्र रेवतकर, डॉ.राजविलास कारमोरे यांची उपस्थिती होती.
आमदार समीर कुणावार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांची फसवणूक करू नका असा मोलाचा कानमंत्र दिला. प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी विद्यार्थ्यांना सखे साजणी या कार्यक्रमातून मोलाचे संदेश काव्यमय रुपात दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.जया तुळसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ प्राध्यापक अजय बिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.राकेश साटोणे यांनी केले.
द्वितीय सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांमध्ये विविध नाटिका, नृत्य, फॅशन शो आयोजित करण्यात आल्या. त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना प्रकट करण्याची संधी महाविद्यालयातर्फे देण्यात आली. 21 जानेवारी व 22 जानेवारी या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखुजा जोशी व मृणमई डफ या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर पद्धतीने केले. तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख संगीता लांडगे यांनी मानले.

