संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तेली महिला मंडळ, रामपूर राजुरा तथा संताजी महिला बचत गट राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या भावस्मृती जपत राजुरा येथे तेली समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू तथा स्नेहमिलन कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी तेली समाज महिला मंडळ, रामपूर राजुरा, संताजी महिला बचत गट राजुरा तथा तेली समाजातील शेकडोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

