रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर येथे दि. 2 जानेवारी 2025 रोजी दुपारी दोन वाजता लहू क्रांती संघर्ष सेना, संघटनेचे अध्यक्ष राजू भाई कसबे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सामाजिक, शैक्षणीक व आर्थिक स्थिती, समाजावर वाढलेला अन्याय अत्याचारा संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी या बैठकीत संघटनेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी मोहन कांबळे, संघटक पदी विठ्ठल नाटकर, युवक प्रदेशाध्यक्ष पदी अशोक साबळे, मराठवाडा अध्यक्षपदी कैलास काळे, जालना जिल्हा कार्याध्यक्ष पदी विठ्ठल भारसाकळे तर परतूर तालुका कार्याध्यक्ष पदी सतिश थोरात यांची निवड करण्यात आली.
या मितींगचे सूत्रसंचालन बाळू सौदागर यांनी केले तर तर आभार अशोक साबळे यांनी मानले त्यावेळी या बैठकीला संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते.

