अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- कृष्ठरोग जनजागृती मोहीम अंतर्गत सावनेर शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा २९ जानेवारीला ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर येथे पार पडली.
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी प्रपाठक डॉ.संदीप गुजर यांच्या पुढाकाराने व शहरातील नामांकित डॉक्टर या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित होते.सावनेर शहरातील वरिष्ठ बालरोग तज्ञ तथा मार्गदर्शक डॉ. विजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी कृष्ठरोग प्रतिज्ञा व तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. या कार्यशाळेस शहरातील वैद्यकीय, व्यावसायिक तसेच आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे सर्व कर्मचारी व राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे संचालन अतुल पारधी यांनी केले. तर कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता विनोद भलावी, वसू पाटील, प्रणय कोरडे, ऋषिकेश पारवे, सचिन झाडे, निलेश राठोड, घनश्याम तुर्के यांचे सहकार्य लाभले.

