राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुबई:- काही दिवसा अगोदर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी परत एकदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल एक वादग्रस्त वक्तव्य करणारे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजात मोठ्या प्रमाणात संताप पसरला आहे.
एका मुलाखतीत चित्रपट अभिनेते राहुल सोलापूर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यात संतापाची लाट उसळली होती. एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून लाच देऊन निसटले होते. त्यांनी मिठाईच्या पेटाऱ्याचा वापर केला नव्हता. महाराजांनी लाच दिल्याचे पुरावे असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावर राज्यात संतापाची लाट उसळली. विविध संघटनांसह राजकीय पक्षांनीदेखील तीव्र आंदोलन केले. समाजातील वाढता रोष पाहता राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. हे प्रकरणाचा धुरळा खाली बसत असताना दुसरीकडे आता त्यांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे.
बाबासाहेबाबदल सोलापूरकर काय म्हणाले?
रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव पुढं वापरतो. तो भीमराव प्रचंड अभ्यास केल्याने वेदां म्हटल्या प्रमाणे आपल्या अभ्यासाने ब्राह्मण ठरतो, असे वक्तव्य राहुल सोलापूर यांनी केले.

