अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला शहराची लोकसंख्या, रस्त्यावरील वाहतूक आणि होणारी कोंडी पाहता, शहर पोलीस वाहतूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे ‘ट्रॅफिक वॉर्डन’ हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या बेरोजगार व पोलीस खात्यामध्ये भरती होऊ इच्छणाऱ्या युवक,युवतीना वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करण्यास इच्छुकांना आवाहन करण्यात यावे. जेणेकरून हे ट्रॅफीक वार्डन बेशिस्त वाहनचालकांना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करतील. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात यावेत.
शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक पोलीस शाखेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे ट्रॅफिक वॉर्डन हा उपक्रम अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री बच्चन सिंग साहेब यांच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेत राबविला जावा.
ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वाहतूक शाखेमार्फत नोंदणी अर्ज भरून घ्यावेत. यात प्रामुख्याने उमेदवार १८ ते ५० वयोगटातील असावा, त्याची संपूर्ण माहिती, पोलीस ठाण्याची हद्द, शिक्षण, ट्रॅफिक वॉर्डनसाठी किती वेळ देणार यासह विविध माहिती अर्जाद्वारे मागुन घ्यावी.तसेच, कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती व प्रतिज्ञापत्रही भरुन घ्यावेत.
ट्रफीक वार्डन हा उपक्रम शहरात राबविण्यास वाहन चालकांना शिस्त लागेल व रोज होणाऱ्या अपघाताला आळा बसेल म्हणून आपण हा ट्रफीक वार्डन उपक्रम सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनदेतेवेळी आकाश धवसे, राजिक शहा, कुणाल राठोड ईत्यादी उपस्थित होते.

