अध्यक्षपदी हरिभाऊ डेहणकर तर सचिवपदी शम्मी पठाण यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा विभागाची महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा वर्धा येथील संत कवरराम भवन येथे आयोजित करण्यात आली होती. दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सन २०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ विभागाचे विभागीय सचिव तथा अमरावती प्रादेशिक सचिव राहुल भाऊ धार्मिक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागाचे विभागीय सचिव मोहित दादा देशमुख, पंकज लांडगे विभागीय सचिव यवतमाळ, नंदु भाऊ नवाते, नौशाद भाई बेग अमरावती अध्यक्ष, निखिल दौलतकर यवतमाळ, रवींद्रभाऊ देशमुख यवतमाळ, तसेच माजी वर्धा विभागीय अध्यक्ष तृणाल वरवटकर हे उपस्थित होते.
यावेळी मोहित देशमुख यांनी कामगार संघटनेच्या उपस्थित असलेल्या सर्व सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षीय भाषणात राहुल धार्मिक यांनी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक समस्या तसेच इतर मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. नंतर सन २०२५ करीता वर्धा विभाग कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी हरिभाऊ देहणकर, कार्याध्यक्ष पदी सचिन काकडे, कोषाध्यक्ष पदी मधुकर शिवणकर तसेच विभागीय सचिवपदी शम्मी पठाण यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शम्मी पठाण यांनी कामगारांना संबोधित करताना कामगारांच्या कुठल्याही समस्या सोडविण्यासाठी संघटना कटिबद्ध असेल असे सर्व सभासदांना आश्वस्थ केले. या वेळी हिंगणघाट आगार सचिव श्रीकांत काशीद यांनी सूत्रसंचालन केले तर आभार शम्मी पठाण यांनी मानले. सभेला अनेक कामगार संघटनेचे सभासद तसेच सर्व आगार युनिट चे पदाधिकारी बहुसंख्य प्रमाणात उपस्थित होते.

