पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन नागपूर:- येथून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे चारचाकी कार शिकत असताना एक भीषण अपघातात 3 युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरज सिद्धार्थ चव्हाण वय 34 वर्ष, रा. बुट्टीबोरी, साजन सिद्धार्थ चव्हाण वय 27 वर्ष, संदीप चव्हाण वय 27 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. मृतक सुरज आणि साजन हे दोघे सख्खे भाऊ असून संदीप हा त्यांचा मित्र होता.
प्राप्त माहितीनुसार, मृतक पैकी एक तरुण कार चालवणे शिकत होता. यावेळी हे तीनही तरुण कारमध्ये बसले होते, त्यावेळी वेगात असलेल्या कारचे नियंत्रण वाहन चालक याने अचानक गमावल्याने ते रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले. विहिरीची खोली सुमारे 15 फूट खोल असल्याने कारसह हे तीनही तरुण विहिरीत बुडून गेले. नाका तोंडांत पाणी गेल्याने त्यांना जलसमाधी मिळाली. या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती ताबडतोब बुटीबोरी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन मदत संस्थांना माहिती दिली.
माहिती मिळताच ताबडतोब पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि विहिरीतून कार बाहेर काढली. परंतु, त्यावेळी तिघांचा मृत्यू झाला. या अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर, त्यातील एक तरुण शिकवणी घेत असताना कार चालवायचा प्रयत्न करत होता, असे स्पष्ट झाले आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

