युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात चिमुकल्या मुली पासून तर वृद्ध महिला पर्यंत सर्वावर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात नागपूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूर शहरातील पारडी परिसरात एका 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी 17 वर्षीय तरुणाला पारडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही संतापजनक घटना सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिढीत चिमुकली आणि नराधम आरोपी एकाच परिसरात राहतात. ही चिमुकली आरोपीच्या ओळखीची होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने या 4 वर्षीय चिमुकल्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तथापि, चिमुकलीने आरडा ओरड केल्याने तिचे पालक तिथे आले आणि पालकांनी हे घृणास्पद कृत्य थांबवले अन्यथा भीषण कांड झाले असते.
त्यानंतर यांची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी पारडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

