अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ द्वारा सुरक्षित बस प्रवास व्हावा याकरिता परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हिंगणघाट बस स्थानकावर प्रवास करतात परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हिंगणघाट बस स्टॅन्ड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले असून सतत चोरीच्या घटना प्रवाशांना सोबत होत आहे.
प्रवास करिता असुरक्षित वातावरण हिंगणघाट बस स्टॅन्ड ठरू लागले असून प्रवास करताना सतत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असून असुरक्षित बस स्टँड म्हणून प्रवाशांच्या नजरेत हिंगणघाट बस स्टॅन्ड ठरत आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी बस मध्ये चढण्याकरिता आपला मोर्चा वळवितात त्याचवेळी बस स्टँड परिसरात दबा धरून असलेले चोरटे कधी मोबाईल कधी सोने मूल्यवान वस्तू प्रवाशांचे रफूचक्कर करून पळता पाय घेत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षित वातावरण निर्माण झाले असून चोरांनी हिंगणघाट बस स्टॅन्ड वर धुमाकूळ माजविला आहे. त्यामुळे हिंगणघाट बस स्थानक सुरक्षेच्या दृष्टीने एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वाढत्या गर्दीच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट बस स्थानकाकडून सुरक्षितेकरिता सीसीटीव्ही सुद्धा बसविले असून त्यामध्ये सुद्धा हे चोरटे चित्रबद्ध होताना दिसत नाही. तेव्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुरक्षेतेची मागणी होताना दिसत आहे.

