आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- सध्या विद्यार्थांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरू आहे. या परीक्षेला सामोरे जात असताना अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येत आहे. त्यातच परीक्षेच्या भविष्यातील निकालाबाबतची धाकधूक विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.
अशातच आता बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने नऱ्हे परिसरातील जाधवर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. आयुष जाधव वय 18 वर्ष, रा. वडगाव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष ने कॉलेजच्या इमारती वरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला तणावामुळे आयुषने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

