संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व शिवसेना तालुकाप्रमुख उदयसिंह प्रल्हादराव बोराडे यांच्या मार्गदर्शनाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.१५ फेब्रू.२०२५ रोजी करण्यात आले आहे. मंठा बाजार समितीच्या परिसरातील शिवसेना संपर्क कार्यालय, प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स मार्केट यार्ड मंठा येथे सकाळी १०:०० ते ३:०० या वेळेत हे शिबीर असेल.
समाजभान जपत शिवमुद्रा प्रतिष्ठान विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. या भावनेतूनच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंठा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी सहभाग नोंदवावा व रक्तदानाविषयी जनजागृती करावी असे शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांनी सांगितले.

