हिंगणघाट शिवसेनेच्या वतीने करण्यात आला पूजा विद्याप्रकाश धोपटे यांचा सत्कार व स्वागत.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत लेबर कॉलनी हिंगणघाट येथील कु. पूजा विद्या प्रकाश धोपटे या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा उत्तीर्ण करून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आपले स्थान पक्के केले. त्यांना शासनातर्फे महसूल विभागात कार्यरत करण्यात आले. या प्रसंग पर त्यांचे सत्कार व स्वागत शिव सेनेच्या वतीने करण्यात आले.
पूजा धोपटे यांचे शिक्षण उच्च माध्यमिक पर्यंत भारत विद्यालय हिंगणघाट येथे तर पदवीपर्यंत शिक्षण वर्धा येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे येथे पूर्ण केली. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असतांना चिकाटी व मेहनतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेत घवघवीत यश घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली त्या बद्दल तिच्यावर अभिमान आहे. त्यांचे अभिनंदन व कौतुक तथा सत्कार करण्याकरिता शिवसेनेचे माजी नगरसेवक मनीष देवडे, या मनोज वरघणे, भास्कर ठवरे, गजानन काटवले, एसटी कामगार सेनेचे भास्कर मानकर, उप सर्कल प्रमुख प्रशांत सुपारे, प्रशांत कांबळे, अविनाश धोटे, पप्पू घवघवे, राजू मंडलवार, आशिष वाघ व इतर सहकारी उपस्थित होते. तिला मिळालेल्या यशाचे श्रेय आई-वडील तथा शिक्षक वृंद आहे. असे यावेळी तिने सांगितले. यावरून शिवसेनेच्या वतीने पूजाच्या आई-वडिलांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.

